"PBP- इनर सर्कल व्हॉल्ट"


या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये तुम्ही शेअर मार्केटचे पूर्ण प्रशिक्षण घेता. पण हे प्रशिक्षण घेताना तुम्हाला काही शंका आल्या, अडचणी आल्या, तर तुम्ही त्या कश्या सोडवाल?


तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी मी स्वतः तुम्हाला दर आठवड्यातुन एकदा लाईव्ह भेटत असतो.


हा जो इनर सर्कल व्हॉल्ट आहे, यामध्ये तुम्ही आलात की दर आठवड्यात एकदा होणार्‍या "मेंबर्स ओनली" प्रायव्हेट लाईव्ह सेशनची लिंक तुमच्या ईमेल आयडीवर पाठवली जाते. 


या लाईव्ह सेशन्समध्ये उपस्थित राहुन तुम्ही तुमचे कोणतेही प्रश्न विचारु शकता.मी नीरज बोरगांवकर स्वतः त्यांची उत्तरे देतो.


तसेच या व्हॉल्टमध्ये आजवर झालेली सर्व सेशन्स रेकॉर्डिंग स्वरुपात तुम्हाला बघायला मिळतीलच. ज्यात इतरांनी विचारलेल्या शंकांचीसुद्धा उत्तरे तुम्हाला बघता येतील आणि तुमचे ज्ञान वाढवता येईल.


शेअर मार्केटमध्ये काम करताना येताना तुम्हाला ज्या अडचणी येतील त्या तुम्ही थेट माझ्याशी शेअर करु शकता. थोडक्यात माझा दर आठवड्यातला काही वेळ मी थेट तुमच्याशी बोलण्यासाठी देत असतो. आणि तुमच्या अडचणी सोडवत असतो.भौगोलिक बंधनांना झुगारुन देऊन तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे या स्पेशल व्हॉल्टमध्ये जॉईन व्हा!


नमस्कार, मी नीरज बोरगांवकर

गेली अनेक वर्षे मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आहे, तसेच मी मराठी माणसांना शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शन करत असतो. हे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या मोठ्या संधीची माहिती पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हे कोर्सेस करू शकता.

या तंत्रज्ञानामुळे अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही हे बहुमोल प्रशिक्षण घेऊ शकत आहात.